
माझी लाडकी बहीण योजना eKYC 2025 कशी करायची : संपूर्ण माहिती.
महाराष्ट्र राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) eKYC करणे आता बंधनकारक केले आहे . तरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी आपली eKYC तात्काळ करून घ्यावी. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ जाहीर केला .
आता eKYC आपल्या घरी कशी करायची हे जाणून घेऊ
आता पहिल्यांदा https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ह्या लिंक वर क्लिक करा. मग तुम्हाला खाली जसा फोटो आहे तस दिसेल.

2. मग त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे ह्या लिंक वर क्लिक करा
3. मग त्यानंतर तुम्हाला खालील फोटो प्रमाणे दिसेल.

4. त्यानंतर फॉर्म मध्ये आपली माहिती भरावी जसे कि आपला आधार क्रमांक, नंतर captcha टाकावा आणि नंतर मी सहमत आहे ह्यावर क्लिक करून, otp पाठवा वर क्लिक करावे.
Biometric Single Fingerprint Scanner हे घेण्यासाठी येथे क्लिक करावे
पुढील तपासणी आणि घोषणा
केवायसी तपासणी: प्रणाली तुमच्या आधार क्रमांकाची तपासणी करेल की तुमची ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
जर ई-केवायसी आधीच पूर्ण झाली असेल, तर “ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
जर ती पूर्ण झाली नसेल, तर तुमचा आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही, हे तपासले जाईल.
पुढील टप्पा:
जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नमूद करण्यास सांगितले जाईल.
संबंधित आधार क्रमांक व कॅप्चा कोड भरून ‘Send OTP’ वर क्लिक करा.
घोषणापत्र (Declaration):
यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागतील
तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य नियमित सरकारी नोकरीत नाही किंवा निवृत्तीवेतन (पेंशन) घेत नाही.
तुमच्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.
प्रक्रिया पूर्ण:
वरील सर्व बाबींची नोंद घेऊन चेक बॉक्सवर क्लिक करा आणि ‘Submit’ बटण दाबा.
शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यास, तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील आणि भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.
100 पेक्षा जास्त सुंदर मराठी सुविचार – Click Here