Marathi News

23 posts
18 July 2026

Manoj Jarange Patil: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा; केंद्र सरकारवर टीका

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला देशभरातून विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन जाहीर करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जरांगे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, शिक्षण व्यवस्थेशी संबंधित वादांवर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी […]

Read More →
18 July 2026

महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात पुढील पाच दिवस विविध भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि मध्यम ते जोरदार सरी पडण्याचा अंदाज असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. १८ जुलैसाठी कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट? १८ जुलै […]

Read More →
17 July 2026

इंजिनीर ने नाकारली तब्बल ९.५ कोटींची ऑफर : आता उभारणार स्वतःचा AI स्टार्टअप

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात काम करणारे आणि IIT Mumbai माजी विद्यार्थी ऋषभ अग्रवाल यांनी करिअरबाबत घेतलेल्या एका निर्णयाची सध्या मोठी चर्चा होत आहे. Meta कडून मिळालेली अत्यंत आकर्षक वेतनाची ऑफर स्वीकारण्याऐवजी त्यांनी स्वतःचा AI स्टार्टअप सुरू करण्याचा मार्ग निवडला आहे. या निर्णयामागे दीर्घकालीन ध्येय आणि स्वतः काहीतरी उभारण्याची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर […]

Read More →
17 July 2026

9 वी ऐवजी 6 वी पासून तिसरी भाषा शिकवण्याची सूचना : CBSE त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

शिक्षण क्षेत्रातील त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. न्यायालयाने नववी इयत्तेत तिसरी भाषा सुरू करण्याबाबत चिंता व्यक्त करत, अशा निर्णयाचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि मानसिक ताणावर परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवले. त्याऐवजी तिसऱ्या भाषेचे शिक्षण सहावीपासून सुरू केल्यास विद्यार्थ्यांना ती भाषा अधिक सहजपणे आत्मसात करता येईल, असे […]

Read More →
16 July 2026

आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; 15 वर्षांचा संसार संपला, संयुक्त पोस्टमध्ये मोठी घोषणा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी वैवाहिक आयुष्य वेगळ्या मार्गाने पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत परस्पर संमतीने विभक्त होत असल्याची अधिकृत घोषणा केली. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांना अखेर या पोस्टमुळे पूर्णविराम मिळाला. संयुक्त निवेदनात आदिनाथ आणि ऊर्मिला यांनी पती-पत्नी म्हणून […]

Read More →
16 July 2026

E20 पेट्रोलमुळे वारंवार बंद पडली कार; ग्राहक न्यायालयाचा मोठा निर्णय, कंपनीला नवी कार देण्याचे आदेश

नवी दिल्ली: E20 पेट्रोलवर चालण्यासाठी योग्य असल्याचा दावा करून विकण्यात आलेल्या कारमध्ये सतत बिघाड होत असल्याची तक्रार ग्राहकाने न्यायालयात नेली आणि अखेर ग्राहकाच्या बाजूने महत्त्वाचा निकाल लागला. ग्राहक न्यायालयाने वाहन उत्पादक कंपनीला 45 दिवसांच्या आत त्याच मॉडेलची नवी E20-सुसंगत कार देण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा कारची संपूर्ण किंमत 20.50 लाख रुपये परत करण्याचे निर्देश देण्यात […]

Read More →
16 July 2026

दिवसभर भीक मागायचा, पण घरात निघाला सोन्याचा खजिना! 54 कोटींच्या सोन्यामुळे उघडकीस आलं मोठं तस्करीचं रॅकेट

आसाममध्ये घडलेल्या एका धक्कादायक कारवाईने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. रस्त्यावर साध्या भिकाऱ्यासारखे आयुष्य जगणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आणि त्यानंतर जे समोर आलं, ते पाहून तपास यंत्रणाही हादरली. छाप्यात घरातून तब्बल 54 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही, तर या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराज्यीय […]

Read More →
15 July 2026

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची गंभीर बिघाड; उपोषण थांबवण्यासाठी दिल्ली हायकोर्टाची सरकारला नोटीस

नवी दिल्ली: प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणादरम्यान प्रकृती झपाट्याने खालावत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यांच्या आरोग्याविषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची तातडीने दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावत उत्तर मागितले आहे. १८ दिवसांपासून सुरू आहे आमरण उपोषण सोनम वांगचुक गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील […]

Read More →
15 July 2026

महिनाभरापूर्वी घेतलेली नवी फॉर्च्युनर ठरली अपघाताचे कारण? रील स्टार प्रतीक शिंदेवर गुन्हा, तीन गाड्यांचा चुराडा

इंदापूर (पुणे): सोशल मीडियावर रील्समुळे लोकप्रिय झालेला इंदापूरचा रील स्टार प्रतीक शिंदे एका भीषण अपघातामुळे चर्चेत आला आहे. पुणे–सोलापूर महामार्गावर झालेल्या या अपघातात एकाचवेळी तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या घटनेनंतर प्रतीक शिंदेविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनवाडी (सकुंडे […]

Read More →
15 July 2026

₹500 कोटींच्या सायबर फसवणुकीचा सूत्रधार पुण्यातून अटक; बनावट बँक खात्यांचे जाळे उघड.

राजस्थान पोलिसांच्या सायबर क्राइम शाखेने देशभर पसरलेल्या तब्बल ₹500 कोटींच्या ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक प्रकरणाचा मोठा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला महाराष्ट्रातील पुणे येथून अटक करण्यात आली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांची आधार, पॅन आणि इतर कागदपत्रे गोळा करत होता. त्यानंतर या कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांमध्ये […]

Read More →
WhatsApp