पाच महिन्यांत 313 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मदतीची प्रक्रिया अद्याप संथ.
महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भात जानेवारी ते मे 2026 या पाच महिन्यांच्या कालावधीत 313 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक नोंद समोर आली आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांतील सरकारी आकडेवारीत ही माहिती नमूद करण्यात आली आहे. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, सर्वाधिक 105 आत्महत्या यवतमाळमध्ये झाल्या. त्यानंतर अमरावती आणि अकोला येथे प्रत्येकी 61, वाशीममध्ये 46 तर बुलढाण्यात […]